अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर जिल्ह्यातील त्या तरुणाच्या आत्महत्येने खळबळ ! मुळा संस्थेशी निगडित सात जणाविरोधात गुन्हा दाखल

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून प्रतीक बाळासाहेब काळे या 27 वर्षीय तरुणाने नगर-औरंगाबाद रोडवर झाडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर येथून समोर आली आहे.

आत्महत्येपूर्वी प्रतीक काळे याने बनवलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्या महाविद्यालयात तो नोकरीला होता तेथील वरिष्ठ देशमुख यांचे नाव घेत

प्रतीकने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. जिल्ह्यात एक मोठे नाव असलेल्या राजकीय नेत्याचा पर्सनल सेक्रेटरी म्हणूनही त्याने यापूर्वी काम केल्याची चर्चा आहे

प्रतीक बाळासाहेब काळे या 27 वर्षीय तरुणाने काल शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुवर्णज्योत नजीक वांबोरी फाट्या नजीक शेतामध्ये लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

याबाबत आत्महत्या केलेल्या प्रतिकची बहीण प्रतीक्षा काळे हिने एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रतीक नोकरीस असलेल्या मुळा संस्थेशी निगडित सात जणाविरोधात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ७ जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या बाबत गुन्हा दाखल केला आहे.

गुन्हा दाखल असलेल्यात 1)व्यंकटेश नामदेव बेल्हेकर 2)विनायक दामोदर देशमुख 3)राहुल जनार्दन राजळे 4)महेश गोरक्षनाथ कदम 5)जगन्नाथ कल्याण औटी 6)रावसाहेब भीमराव शेळके 7)रितेश बबन टेमक यांची नावे असून ही सर्व मुळा संस्थेशी निगडित असल्याचे समजते.

हे सर्व जन प्रतिकला गेल्या सहा महिन्यांपासून मानसिक त्रास देत होते. प्रतिकच्या प्रामाणिकपणा मुळे तो गडाख कुटुंबाच्या जवळ गेला होता. यामुळे या सात जणांनी प्रतिकला त्रास देण्यास सुरुवात केली.

त्याला तू नोकरी सोड, महाराष्ट्रात राहू नको असे सांगण्यात आले होते. त्याची खानावळ बंद पाडण्यात आली, ऍडव्हान्स कमी करण्यात आला, बळजबरीने राजीनामा घेण्यात आला पण तो मंजूर केला नाही.

हा सर्व अन्याय आणि त्रास प्रतीक घरी नेहमी सांगत होता. अखेर त्रास असह्य झाल्याने त्याने आत्महत्याकेली असून यास जबाबदार असणाऱ्या सातही जणांना अटक करून प्रतिकला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी बहीण प्रतीक्षा काळे यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Back to top button