फॅब्रिकेशनचे दुकान फोडले; तोफखाना पोलिसांनी दोघे गजाआड केले

शहरातील बोल्हेगाव उपनगरातील फॅब्रिकेशनचे दुकान फोडणारे अकील उर्फ भुर्या पापा भाई शेख (वय 33) राजकुमार शिवानंद निसाद (वय 25) यांना तोफखाना पोलिसांनी गजाआड केले आहेत.
त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनील सुखदेव भालेराव (वय 39 रा. गांधीनगर, बोल्हेगाव) यांचे आंबेडकर चौकात फॅब्रिकेशनचे दुकान आहे.
चोरट्यांनी 3 मार्च रोजी दुकानाचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश केला. 7 लोखंडी बाकडे, 2 भारत गॅसच्या टाक्या, 1 गॅस शेगडी असे साहित्य चोरले होते. भालेराव यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस अंमलदार दत्तात्रय जपे, विक्रम वाघमारे, शिरीष तरटे, शैलेश गोमसाळे, अतुल कोतकर यांच्या पथकाने तपासामध्ये आरोपी अकील उर्फ भुर्या पापा भाई शेख आणि राजकुमार शिवानंद निसाद या आरोपींना अटक केली.