तिने प्रोपोज केले.. मी स्विकारले ती.. खोट बोलत गेली आणि मी ऐकत राहीलो… सोशल मीडियावर पोस्ट लिहून तरुणाने केले असे काही…

अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातून एक धक्कदायक अशी बातमी समोर आली आहे, प्रवरासंगम येथील पुलावरुन या युवकाने नदीपाञात उडी मारलेली आहे पाणी कमी असल्यामुळे हा युवक गाळात फसला असावा असा संशय पोलीसांनी व्यक्त केलेला आहे.
नदीपाञात या युवकाचा शोध घेण्यात आला माञ या युवकाचा मृत्युदेह चोवीस तास उलटूनही हाती लागलेला नसल्यामुळे पोलीस युद्ध पातळीवर या युवकाचा शोध घेत आहेत.
ता: तीने प्रोपोज केले.. मी तीचे प्रोपोज स्विकारले ती.. खोट बोलत गेली आणि मी तीच ऐकत राहीलो. शेवटी फसगत झाली जीवनात दोन गोष्टी महत्वाच्या असतात एक लग्न आणि दुसर करिअर दोन्ही गोष्टीत मी अपयशी ठरलो.
शेअर मार्केटमध्ये कर्जबाजारी झालो त्यामुळे मी माझा स्वता:चा चेहराही आरशा समोर उभा राहून पाहू शकत नाही ? मी आत्महत्या करत असून यामध्ये कोणालाही जबाबदार धरु नये असा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करुन सोमवार (दि.१५) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपाञात पुलावरुन उडी मारुन नेवासा येथील एका युवकाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.
चोविस तास उलटून गेले तरीही या युवकाचे प्रेत पोलीसांना सापडू न शकल्याने मृतक युवकाच्या प्रेताची शोधाशोध युद्घ पातळीवर गोदावरी नदी पात्रात सुरु आहे. मात्र अद्यापही या युवकाचा मृत्युदेह शोधण्यात पोलीसांना यश आलेले नाही.