अहमदनगर

महिलेने दिल्या ग्राहकांना बनावट पॉलिसी; दोन वर्षानंतर…

वाहनाचा इन्श्युरन्स उतरवण्याकरिता आयडीबी मध्ये फेरबदल करून 110 ग्राहकांना सहा लाख 15 हजार रूपयांना चुना लावणार्‍या महिलेला दोन वर्षानंतर कोतवाली पोलिसांनी अटक केली.

सिमरण नंदकुमार पाटोळे (वय 26 रा. नागापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुमारे 110 ग्राहकांस बनावट इन्श्युरस पॉलिसी देवून सहा लाख 15 हजार 684 रूपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

वासन ब्रदर्स प्रा.लि. केडगाव येथे सिमरण पाटोळे हिने वाहनाचा इन्श्युरन्स उतरवण्याकरिता एकुण 110 ग्राहकांकडून जास्त रक्कम घेऊन प्रत्यक्षात शोरूममध्ये कमी रक्कमेचा भरणा केला.

आय. डी. बी. मध्ये फेरबदल करून ग्राहकांना जास्त रक्कम भरल्याच्या फेरफार केलेल्या इन्श्युरन्स पॉलिसी देवून एकुण सहा लाख 15 हजार 684 रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला होता.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सिमरण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिश सुभाष आहुजा (वय 38 रा. तारकपूर) यांनी फिर्याद दिली होती. सन 2018 ते 1 जुलै, 2020 दरम्यान हा प्रकार घडला होता.

गुन्हा दाखल झाल्यापासून सिमरण पसार होती. पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी सिमरण पाटोळे हिला अटक केेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button