बाजारभाव

कांदा भावात घसरण; मिळतोय ‘हा’ भाव

अहमदनगर- नेवासा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कांद्याच्या आवकेत जवळपास एक हजार गोण्यांनी वाढ झाली तर जास्तीत जास्त भावात 100 रुपयांची घसरण झाली.

 

सोमवारच्या लिलावासाठी एकुण 65 हजार 368 गोणी नविन लाल कांद्याची आवक झाली होती. एक-दोन लॉटला 1500 ते 1600 रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 

मोठा कलर पत्तिवाल्या कांद्याला 1400 ते 1500 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1300 ते 1400 रुपये, गोल्टा 1100 ते 1300 रुपये, गोल्टी कांद्याला 500 ते 800 रुपये, जोड कांद्याला 200 ते 500 रुपये तर हलका डॅमेज कांद्याला 200 ते 400 रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button