अहमदनगर
कांद्याच्या भावात घसरण; सोयबीनला मिळतोय ‘हा’ भाव

Advertisement
अहमदनगर- श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा व भुसार मार्केटमध्ये काल सोयाबीनला 5950 रुपये क्विंटल असा भाव मिळाला आहे. तर कांद्याला 2000 रुपये भाव मिळाला आहे. कांदा भावात घसरण झाली आहे.
मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याची 9793 गोणीतून एकूण 5296.73 क्विंटल आवक झाली. त्यातील नंबर 1 कांदा कमीत कमी 1300 ते जास्तीत जास्त 2000 रुपये क्विंटल, नंबर 2 कांदा 800 ते 1250 व नंबर 3 कांदा 250 ते 750 तसेच गोल्टी कांदा 750 ते 1300 असे बाजारभाव निघाले.
Advertisement
भुसार मार्केटमध्ये एकूण 143 क्विंटल मालाची आवक झाली. त्यात सोयाबीनची 120 क्विंटल आवक होऊन 5400 ते 5950 व सरासरी 5800 भाव मिळाला.
Advertisement