अशी वेळ कोणावरही येऊ नये ! रेल्वेतून जिल्हा थेट रूग्णालयात आणि इथे मृत्यू….

अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालया मध्ये शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागून कोविड वार्ड मध्ये उपचार घेत असलेल्या १७ रुग्णांपैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाला
या घटनेतील एका मृताची कहानी निराळी आहे. त्याच्या दैवदुर्विलास म्हणजे काय हे सांगणारी ही घटना आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात आगीमुळे 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 58 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा समावेश आहे.
या व्यक्तींचा प्रवास मन हेलावणारा आहे. शरीराने धडधाकट असलेला 58 वर्षीय व्यक्ती अहमदनगर रेल्वे स्थानकावर रेल्वेतून खाली उतरत असताना पाय घसरून खाली पडला. रेल्वे पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
त्याला कोविड असल्याच्या संशयातून कोविड अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. याच विभागाला लागलेल्या आगीत या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला.
रेल्वेतून पाय घसरून खाली पडलेल्या प्रवाशाला रुग्णालयात दाखल करून 24 तास पूर्ण होण्याच्या आतच अतिदक्षता विभागाला आग लागली.
या व्यक्तीच्या पायाला दुखापत झालेली होती. त्यामुळे आगीपासून स्वतःचा जीव वाचविण्यासाठी पळता ही आले नाही. आणि मृत्यूच्या दाढेत सापडून मृत्यू ओढावला.