अहमदनगर

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला मारहाण; चौघांना कारावास

अहमदनगर- सोनाळवाडी (ता. कर्जत) येथील शेतकरी जालिंदर कोंडीबा काळे यांना जमिनीच्या वादातून जबर मारहाण करून जखमी करणार्‍या चौघांना कर्जतच्या प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी मोहम्मद वसीम शेख यांनी दीड वर्षे कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

 

अजित दादा हिनगुडे, गणेश भाऊसाहेब हिनगुडे, दादा यशवंत हिनगुडे, भाऊसाहेब यशवंत हिनगुडे (सर्व रा. सोनाळवाडी, ता. कर्जत) अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

 

कर्जत तालुक्यातील सोनाळवाडी याठिकाणी जालिंदर कोंडीबा काळे यांनी एका शेतकर्‍याची जमीन खरेदी करण्यासाठी ते संबंधित जमिनीची मोजणी करत असताना त्याठिकाणी अजित हिनगुडे, गणेश हिनगुडे, दादा हिनगुडे, भाऊसाहेब हिनगुडे हे सर्वजण त्याठिकाणी आले. तुम्हीही शेत जमिनीची मोजणी का करत आहेत. ही जमीन तुम्ही विकत घ्यावयाची नाही. हे शेत आम्हाला घ्यायाचे आहे असे म्हणून जालिंदर काळे यांना अचानक लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

 

गजाने त्यांना मारहाण करून गंभीर दुखापत केली होती. याप्रकरणी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने चारही आरोपींना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये प्रत्येकी दंड दिला आहे.

 

याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते यांनी सखोल तपास केला व पोलीस जवान गणेश आघाव यांनी मदत केली सरकारी वकील म्हणून श्री जायभाय यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button