अहमदनगर

‘पीएम’ किसानचा लाभ घेणार्‍या शेतकऱ्यांनी या तारखेपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा…

अहमदनगर- जिल्ह्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणार्‍या पात्र शेतकर्‍यांना 31 ऑगस्ट पूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, तहसिलदार सुनिता जराड उपस्थित होते.

 

डॉ. भोसले पुढे म्हणाले की, जिल्ह्यात या योजनेच्या एकुण लाभार्थ्यांपैकी 61 टक्के इतक्याच पात्र शेतकर्‍यांनी बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. 39 टक्के पात्र शेतकर्‍यांनी अद्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे 31 ऑगस्ट 2022 पर्यंत ऑनलाईन प्रक्रिया करून घ्यावी.

 

मुदतीमध्ये प्रमाणिकरण न करणार्‍या शेतकर्‍यांना जूलै 2022 नंतर या योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागू शकते. याची संबंधित शेतकर्‍यांनी नोंद घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button