Thursday, May 30, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : अहमदनगरमधील 'या' गावातील शेतकऱ्याचा मुलगा बनला उपजिल्हाधिकारी

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘या’ गावातील शेतकऱ्याचा मुलगा बनला उपजिल्हाधिकारी

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याचा नावलैकिक अनेक क्षेत्रात पसरलेला आहे. विविध क्षेत्रांमध्ये मग ते नाट्य असो, संगीत असो की कला या प्रत्येक क्षेत्रात नगरकरांचा मानाचा तुरा रोवलेला आहे.

आता अहमदनगर जिल्ह्यातून अधिकारी होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अहमदनगरने आजवर अनेक अधिकारी दिलेत. आता अहमदनगर जिल्ह्यातील एका छोट्या गावातील शेतकऱ्याच्या मुलाने यशाला गवसणी घातली आहे.

तिसऱ्याच प्रयत्नात तो उपजिल्हाधिकारी झाला आहे. विकास मनसुक कर्डिले असे या अधिकारी झालेल्या मुलाचे नाव आहे. नेवासे तालुक्यातील

गेवराई येथील रहिवासी आहे. दोन अपयशाच्या अग्नी परीक्षेनतर त्याला यश मिळाले. त्यांनी एमपीएससी परीक्षेत ११ वी रँक मिळवत उपजिल्हाधिकारीपदी गवसणी घातली. त्यामुळे नेवासे तालुक्यासह अहमदनगर जिल्ह्याची मान उंचावली आहे.

विकास याचे प्राथमिक शिक्षण गेवराई, तर माध्यमिक शिक्षण गेवराई येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. तर नगरच्या न्यू आर्टस् कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षणानंतर पुण्याच्या ढोले पाटील येथे मैकॅनिकल इंजिनिअर तो झाला.

त्यानंतर २०१९, २०२० असे दोन वेळा एमपीएससी परीक्षेत त्याला अपयश आले. मात्र, २०२२ च्या परीक्षेत मात्र त्याने यश गाठले.

 गावात आनंदोत्सव : उपजिल्हाधिकारीपदी निवड झाल्याचे कळताच गेवराई गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सरपंच सुनंदा कर्डिले, सेवा संस्था अध्यक्ष प्रतीक गोरे, माजी सरपंच कपूरचंद कर्डिले आदींच्या हस्ते विकास याचा ग्रामपंचायत,

सहकारी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास गाव व परिसर जमा झाला होता. दोनवेळा अपयश आले. पण त्याने जिद्ध न सोडत आपली परिश्रम सुरू ठेवले आणि त्यास तिसऱ्यांदा यश मिळाले. याच गावच्या जान्हवी विनायक कर्डिले हिने याच परीक्षेतून सांख्यिकी विभागात संशोधन अधिकारीपदी यश मिळवले.

याच गावचा राहुल कर्डिले हा प्रशासकीय सेवेत आहे. तो आयएएस झालेला गावातील पहिला तरुण आहे. खेड्यातील विकासने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. त्रिमूर्ती संस्था संस्थापक साहेबराव घाडगे पाटील यांनी विकासचे अभिनंदन केले.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments