अहमदनगर

शेतक-यांना शेतीसाठी कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता घ्या; पालकमंत्र्यांच्या सूचना

 पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी येत्‍या खरीप हंगामात शेतक-यांना शेतीसाठी आवश्‍यक असलेले बी-बीयाणे, खताचा पुरवठा या महत्‍वाच्‍या बाबींचे नियोजन करून त्‍यांना कोणतीही अडचण येणार नाही याची दक्षता कृषी विभागाने घ्‍यावी

तसेच जिल्‍ह्यातील ऊस उत्‍पादकांचा ऊस शिल्‍लक राहता कामा नये याचेसुध्‍दा नियोजन करावे. अशा सूचना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.

दरम्यान जिल्‍हास्‍तरावरील सन 2022 मधील खरीप हंगाम पूर्व तयारी व नियोजनाबाबत राज्‍याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री यांनी कृषी विभागाशी संबंधित सर्व यंत्रणांच्‍या कामकाजाचा व तयारीचा आढावा घेतला. जिल्‍हाधिकारी कार्यालयात आज यासंदर्भातील बैठकीचे पालकमंत्र्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आयोजन करण्‍यात आले होते.

या बैठकीला आमदार लहु कानडे, आमदार आशुतोष काळे, जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्‍हा  पोलीस अधिक्षक मनोज पाटील, जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्‍हा कृषी अधिक्षक शिवाजीराव जगताप,

जिल्‍हा दुय्यम निबंधक दिग्विजय आहेर, कृषी उपसंचालक अंकुश माने, उपविभागीय कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, विलास नलगे, श्रीरामपूर, सुधाकर बोराळे, संगमनेर, उपसंचालक (आत्‍मा), आर. के. गायकवाड आदी वरिष्‍ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्‍ह्यात रासायनिक खतांची कमतरता भासणार नाही याचे सुध्‍दा नियोजन करावे. बियाणेसंदर्भात खाजगी कंपनीकडून वेळेत बियाणे शेतक-यांना उपलब्‍ध करून द्यावे. शेतक-यांना गुणवत्‍तापूर्ण निविष्‍ठा  मिळण्‍यासाठी एकुण 42 गुणवत्‍ता नियंत्रक निरीक्षक कार्यरत असून त्‍यांच्‍या माध्‍यमातुन एकुण 15 भरारी पथकांची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

हेल्पलाईन क्रमांक
कृषि निविष्‍ठाबाबत शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍यासाठी तसेच अडचणी सो‍डविण्‍यासाठी व त्‍यांच्‍या तक्रारींचे निवारण करण्‍यासाठी 18002334000 हा टोल फ्री क्रमांक व 0241-2353693 हा लँडलाईन क्रमांक देण्‍यात आला आहे. अशी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button