जीवे मारण्याच्या भीतीने त्याने धावत्या गाडीतून मारली उडी; नगर शहरातील घटना

गाडी मालकाला मारहाण करत बळजबरीने गाडी चोरून नेल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील बालिकाश्रम रोड येथे घडली आहे.
या प्रकरणी सद्दाम याकुब पठाण (वय 25, रा. टाकळी काझी, (ता.जि. नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये अब्दुल मोहम्मद सय्यद (रा. शिवाजीनगर, अहमदनगर) याच्यासह त्याच्या साथीदारांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फिर्यादी पठाण यांनी गाडी त्यांच्या दुकानासमोर उभी केलेली असताना आरोपी गाडीच्या बोनेटवर बसलेले होते.
पठाण यांनी त्यांना खाली उतरण्यास सांगितले असता त्यांना मारहाण करून बळजबरीने गाडी बसविले. त्यानंतर आम्ही सांगू तिकडे गाडी घे, नाहीतर तुला मारून टाकू अशी धमकी देण्यात आली.
आरोपींनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने पठाण यांनी गाडी सावकाश चालवत चालू गाडीतून उडी मारत पळ काढला. त्यानंतर तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी गाडीचा शोध घेत गाडी ताब्यात घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे.