अहमदनगर

अज्ञान असल्याचे भासवून वडिलोपार्जित मिळकत बळकावली

अहमदनगर- सज्ञान असतानाही अज्ञान असल्याचे भासवून वडिलोपार्जित मिळकतीची परस्पर विक्री केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेले महेश सुरेश दळवी (वय 18 रा. माणिकचौक) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

पोलिसांनी सुरेखा रमेश दळवी, अरूण दत्तात्रय दळवी व माधुरी राहुल ससाणे (रा. माणिकचौक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

फिर्यादी यांची आजी मयत झाल्यानंतर तीचे नावे असलेल्या मिळकत घरक्र. 7367. सि.स. क्रमांक 3732/ब क्षेत्र 47.70 चौरस मीटर घर नं. 7367 सिटी पोलीस लाईन समोर कोतवाली पोलीस स्टेशनसमोर माणिक चौक यावर वारसा हक्काने फेरफार नोंद घेण्यात आली होती. सन 2020 साली फिर्यादी महेश यांचे वडील सुरेश दत्तात्रय दळवी हे मयत झाले. सन 2021 मध्ये फिर्यादीची चुलती सुरेखा दळवी हिने फिर्यादी व त्यांचा लहान भाऊ यांचेवतीने अज्ञान पालककर्ती म्हणुन स्वतःचे नाव फेरफार क्रमांक 23574/2021 अन्वये नोंद केलेली होती.

 

वर नमुद मिळकतीचे दिनांक 28 सप्टेंबर, 2020 रोजी माधुरी राहुल ससाणे यांना साठे खरेदी खत लिहून दिले होते. दरम्यान फिर्यादी यांनी त्यांच्या प्रॉपटीबाबत माहिती घेतली असता त्यांना असे समजले की, मी अज्ञान असताना माझे कुटुंबी यांनी माधुरी राहुल ससाने यांना साठे खत करून दिलेले होते. त्या साठे खतावरून खरेदी खत लिहून देण्यासाठी माझे चुलते अरूण दळवी व चुलती सुरेखा रमेश दळवी यांनी मी सज्ञान झालेलो असताना देखील त्यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून मी व माझा भाउ दिनेश दळवी अज्ञान असल्याचे सांगुन सदरचे खरेदी दस्त करण्याकामी न्यायालयाकडुन परवाणगी प्राप्त करून घेतली.

 

सह दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग क्र. 2 नगर कार्यालयामध्ये दस्त क्र. 6280/2022 3 ऑक्टोबर, 2022 अन्वये माधुरी राहुल ससाने हिला 15 लाख रूपयामध्ये खरेदी लिहुन दिलेली आहे. सदर खरेदी दस्तावर फिर्यादी सज्ञान असतांना देखील त्यांना न सांगता दिल्याने त्यांची फसवणूक झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button