अहमदनगर

गर्भपात गोळ्यांचा काळाबाजार ! नगर शहरातील ‘या’ मेडिकल एजन्सीच्या मालकावर गुन्हा दाखल

औषध प्रशासन व एमआयडीसी पोलिसांनी एमआयडीसीतील ट्रान्सपोर्ट कंपनीत आढळून आलेल्या गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा जप्त केला होता.

याप्रकरणी औषध प्रशासनाचे सहा. आयुक्त ज्ञानेश्वर दरंदले यांनी फिर्याद दिली आहे. यावरून श्रीराम एजन्सीचे मालक नितीन जगन्नाथ बोठे (रा. टीव्ही सेंटर, सावेडी) आणि आयव्हीए हेल्थ केअर कंपनीच्या संचालक मंडळाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान हा साठा पंचकुला (हरियाणा) येथील आयव्हीए हेल्थ केअर या कंपनीतून अहमदनगर शहरातील श्रीराम एजन्सीकडे आल्याचे तपासात समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, एमआयडीसी पोलीस व औषध प्रशासनाने गर्भपाताच्या गाळ्यांचा साठा जप्त केला होता. सात लाख 66 हजार 440 रूपये किंमतीचा साडेचार हजार गोळ्यांचा हा साठा होता.

बिल मात्र दुसर्‍या गोळ्यांच्या नावाचे असल्याने याबाबत संशय व्यक्त होत आहे. पोलीस व औषध प्रशासनाने तो साठा जप्त करून तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान श्रीराम एजन्सीचे मालक नितीन बोठे हा गर्भपाताच्या औषध विक्रीचा विनापरवाना व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. श्रीराम एजन्सी आंनद बाजार, पटवर्धन चौक या जागेत कार्यरत नसून त्याऐवजी ते त्यांच्या राहत्या घरातून 30 शिवनेरी पंकज कॉलनी टी.व्ही.सेंटर या जागेतु विनापरवाना औषधाची खरेदी व विक्री करत असल्याचे कळविले आहे.

सर्व बाबी विचारात घेता गर्भपातासाठी वापरण्यात येणारा औषधाचा काळाबाजार करणारे खुप मोठे रॅकेट असण्याचे बोठे याने मान्य केले. परंतु औषधाचा साठा त्यांचा नसल्याचे त्याने सांगितले. दरम्यान पोलिसांनी आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button