अहमदनगर

तरूणीवर अत्याचार करून केले मोबाईलमध्ये चित्रिकरण; तरूण गजाआड

लग्नाचे आमिष दाखवुन तरूणाने तरूणीवर अत्याचार केला. अत्याचाराचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करून त्याद्वारे तरूणीला ब्लॅकमेलिंग केले. तरूणीने फिर्याद दाखल करताच तो पसार झाला.

गोवा, नाशिक, संगमनेर आदी ठिकाणी वास्तव्याचे ठिकाण बदलत नगरमध्ये आला. तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गणेश सोन्याबापू शिंदे (रा. शिंदे मळा, बालिकाश्रमरोड, अहमदनगर) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे.

अहमदनगर शहरातील उपनगरात राहणार्‍या तरूणीने गणेश शिंदे विरोधात 21 मार्च, 2022 रोजी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गणेशने फिर्यादी तरूणीला त्याच्या घरी बोलवून लग्नाची मागणी घातली.

त्या मागणीला तरूणीने होकार दिला. तेव्हा गणेशने तरूणीच्या इच्छेविरूध्द संबंध केले व त्याचे मोबाईलमध्ये चित्रिकरण केले. चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत गणेशने तरूणीकडे पैशाची मागणी केली होती.

तो नगरमध्ये आल्याची माहिती तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रणदिवे, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, अविनाश वाकचौरे, भास्कर गायकवाड, सचिन बाचकर, धीरज खंडागळे, नीलेश ससे, सतीष भवर यांच्या पथकाने आरोपी शिंदेला अटक केली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button