अहमदनगर

आ. पवारांच्या प्रयत्नांतून कर्जत-जामखेडसाठी पाच रुग्णवाहिका !

कर्जत-जामखेडची आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या दृष्टीने आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी मिळालेल्या पाच रुग्णवाहिकांचे दि. १४ जून रोजी लोकार्पण आ. रोहित पवार यांच्यासह अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

आ. पवार यांच्या कल्पनेतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी सुमारे ४० रुग्णवाहिका मिळाल्या आहेत.आमदार झाल्यापासून आ. पवार यांनी मतदारसंघातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी अनेक निर्णय घेतले.

मतदारसंघातील दोन्ही तालुक्यांतील सरकारी रुग्णालयांमध्ये खाटांची संख्या वाढविणे, आवश्यक उपकरणे पुरवणे, औषधे पुरवणे, मनुष्यबळ पुरवणे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी दोन्ही तालुक्यांत अद्ययावत कोविड सेंटर सुरू केले. यापूर्वी त्यांच्याच प्रयत्नांतून मतदारसंघासाठी जिल्हा परिषदेमार्फत तीन तर राज्य शासनामार्फत दोन रुग्णवाहिका मिळाल्या आहेत.

यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ, जि. प. अध्यक्षा सौ. राजश्रीताई घुले, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर आणि इतर सदस्यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी सामाजिक संस्थेच्या माध्यमातूनही आणखी एक रुग्णवाहिका मिळाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही आमदार रोहित पवार यांनी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दोन आणि आमदार निधीतून एक, अशा तीन रुग्णवाहिका दिल्या.

आता आणखी पाच आणि सामाजिक संस्थेमार्फत एक, अशा एकूण नऊ रुग्णवाहिका कर्जत-जामखेड मतदारसंघाला मिळाल्या आहेत. कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात आ. पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, पत्रकारांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button