अहमदनगर

कोवीड सेंटरला पाच लाखांचे टॉयलेट

पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील विजयगंगा रूरल फाऊंडेशन व ओंकार हॉस्पिटलचे संचालक डॉ.किरण रोहोकले व डॉ.तनुजा रोहकले यांचे सामाजिक दायित्व काय आहे हे कोरोनाने दाखवून दिले आहे. त्यांनी आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या कोव्हिड सेंटरला पाच लाख रुपयांचे टॉयलेट भेट देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे.

समाजात वैद्यकीय क्षेत्रात भरीव काम करणारे अनेक डॉक्टर आहेत, पण वैद्यकीय सेवेबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे खुप कमी आहेत. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनाने आयुष्यभर काम करणारे पण जे काम केले त्या गोष्टीची कुठलीही प्रसिद्धी न मिरवता गोर गरीबांना कायम मदतीचा हात हे डॉक्टर दांपत्य देत आले आहेत.

ते म्हणजे भाळवणी मधील ओंकार हॉस्पिटलचे संचालक डॉ.किरण रोहोकले व डॉ. तनुजा रोहोकले हे आहेत. गेली अनेक वर्ष हे रोहोकले दांपत्य वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून समाजाची सेवा करत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासुनच हजारो कोरोना रूग्णांवर अत्यल्प पैशामध्ये सेवा देत रूग्णाचे प्राण वाचवण्याचे काम करीत आहेत.

आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे ११०० बेडचे कोविड सेंटर सुरु केल्यापासून आ. लंके यांच्या खांद्याला खांदा लावुन हे दांपत्य काम करत आहे, मग ती वैद्यकीय मदत असो, आर्थिक असो किंवा वैद्यकीय साहित्यांचे मदत असो, यात या दांम्पत्यांचा मोलाचा वाटा आहे.

आ. लंके यांनी सुरू केलेल्या भाळवणी येथील शरदचंद्र पवार कोविड सेंटरला पाच लाख रुपये किंमतीचे टॉयलेट या दांपत्यानी त्यांच्या विजयगंगा रूरल मेडीकल फाऊंडेशन व ओंकार मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून भेट देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे.कोविड सेंटरमध्ये गंभीर झालेल्या बऱ्याच गरीब रुग्णांना आमदार लंके यांनी डॉ. रोहोकले यांच्या दवाखान्यात पाठविले. त्या सर्व गरीब रुग्णांना मोफत उपचार देत त्या रूग्णांना बरे करण्याचे काम या दांपत्याने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button