Flipkart Offer : ही ऑफर पुन्हा नाही ! चक्क 50 हजार रुपयांचा फोन 15 हजारांमध्ये मिळतोय, लाभ घेण्यासाठी बातमी लगेच वाचा
तुम्ही हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता. हा 50 हजार रुपयांचा फोन तुम्ही 15 हजारांमध्ये तुमच्या खिशात ठेवू शकता.

Flipkart Offer : तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर स्मार्टफोनची किंमत असेल तेवढे पैसे देऊन नवीन स्मार्टफोन खरेदी करत असता. मात्र जर तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही अनेक ऑफरचा लाभ घ्यायला हवा.
आज आम्ही तुम्हाला अशीच एक ऑफर सांगणार आहे. ही ऑफर Realme GT 2 Pro या स्मार्टफोनवर आहे.या स्मार्टफोनची किंमत 49,999 रुपयांवर गेली आहे. मात्र फ्लिपकार्टच्या डीलमध्ये तुम्ही 35,000 रुपयांपर्यंत सूट देऊन खरेदी करू शकता. तसेच फोनवर कॅशबॅक ऑफरही दिली जात आहे.
जर तुम्ही दमदार कामगिरीसह स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी Realme GT 2 Pro हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. विशेष बाब म्हणजे फ्लिपकार्टच्या डीलमध्ये तुम्ही हा फोन एमआरपीवरून अगदी स्वस्तात खरेदी करू शकता.
8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची एमआरपी 57,999 रुपये आहे. डीलमध्ये सूट मिळाल्यानंतर त्याची किंमत 49,999 रुपयांपर्यंत खाली आली आहे. कंपनी या फोनवर 35,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देखील देत आहे.
जुन्या फोनच्या संपूर्ण एक्सचेंजवर हा फोन 49,999 – 35,000 रुपयांमध्ये म्हणजेच 14,999 रुपयांमध्ये तुमचा असू शकतो. लक्षात ठेवा की एक्सचेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोनच्या स्थितीवर अवलंबून असेल. तुमच्याकडे Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्हाला 5% सूट देखील मिळेल.
वैशिष्ट्ये आणि स्पेसिफिकेशन
फोनमध्ये, तुम्हाला 1440×3216 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7-इंचाचा 2K LTPO AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये दिलेला हा डिस्प्ले 120Hz च्या अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कंपनी यात गोरिल्ला ग्लास व्हिक्टस देखील देत आहे. हा Realme फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे.
Snapdragon 8 Gen 1 चिपसेटने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन रियर कॅमेरे आहेत. यात 50-मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि 2-मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरासह 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे.
फोनमध्ये दिलेला मुख्य कॅमेरा OIS म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन फीचरसह येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल.
OnePlus 5G फोन खरेदीवर 9 हजार रुपयांचा फायदा
इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनची बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी 65W सुपर डार्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करतो.
कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 6, Bluetooth 5.2, GPS, NFC आणि USB Type-C पोर्ट सारखे पर्याय देण्यात आले आहेत. फोन पेपर ग्रीन, पेपर व्हाइट आणि स्टील ब्लॅक या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.