Flipkart Upcoming Sale : बंपर संधी ! 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत मिळवा खूप स्वस्तात स्मार्टफोन्स, लाभ घेण्यासाठी बातमी सविस्तर वाचा
तुम्हाला 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत या कालावधीमध्ये ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या ऑफर्स दिल्या जाणार आहेत. तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.

Flipkart Upcoming Sale : सध्या देशात सणासुदीचे दिवस आहेत. अशा वेळी जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही स्वस्तात स्मार्टफोन घरी आणू शकता.
सध्या सुरु असलेल्या या सणासुदीच्या दिवसात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही विक्री सुरू होणार आहे. या क्रमाने, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल देखील आयोजित करेल. सध्या त्याची विक्रीची तारीख जाहीर केलेली नाही. पण, कंपनी नक्कीच 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत वेगवेगळ्या कंपन्यांच्या स्मार्टफोन डील जाहीर करणार आहे.
Flipkart वर सुरु होणाऱ्या या आगामी बिग बिलियन डेज सेल दरम्यान, स्मार्टफोन वगळता जवळपास इतर सर्व श्रेणींच्या उत्पादनांवर डील आणि सवलत उपलब्ध असतील. तर ग्राहकांना एक्सचेंजवर अतिरिक्त सवलत आणि फोनवर बँक सवलत देखील मिळेल. याशिवाय, ग्राहकांना नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळतील. या सेलमध्ये ग्राहकांना नवीन फोन लॉन्च होतानाही बघायला मिळतील.
कोणत्या कंपनीच्या ऑफर्स कोणत्या दिवशी येतील?
फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, 28 सप्टेंबर रोजी मोटोरोलाचे, 29 तारखेला विवोचे, 30 रोजी इन्फिनिक्सचे, 2 ऑक्टोबरला नथिंगचे, 3 ऑक्टोबर रोजी सॅमसंगचे, 4 ऑक्टोबर रोजी पोकोचे, 5 ऑक्टोबर रोजी गुगल पिक्सेलचे, 6 Realme डील 7 ऑक्टोबरला, Xiaomi 7 ऑक्टोबरला आणि Oppo या स्मार्टफोनची ऑफर 8 ऑक्टोबरला उघड होणार आहे.
दरम्यान, तुम्ही तुमच्या आवडत्या कंपनीच्या ऑफर येण्याची वाट पाहू शकता. कारण अशी शक्यता आहे की कंपनी यावेळी फोन प्री-सेलमध्ये लॉन्च करेल किंवा ठराविक दिवशी सर्व फोनची विक्री सुरू केली जाईल. त्यामुळे तुमचा अधिक फायदा होण्याची शक्यता आहे.
अशा वेळी सध्या, कंपनीने फ्लिपकार्टवर काही स्मार्टफोन्सची नावे जाहीर केली आहेत ज्यावर मोठी सूट मिळणार आहे. या फोनच्या नावांमध्ये Vivo T2 Pro 5G, Galaxy S21 FE आणि Realme C53 यांचा समावेश आहे. त्यामुळे जर स्वस्त स्मार्टफोन हवा असेल तर ही संधी तुम्ही सोडू नका.