ताज्या बातम्या

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी

अनुसूचित जाती प्रवर्गाच्या मुला-मुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेतर्गत शिष्यवृत्ती निवडीसाठी सन २०२३-२४ करिता पात्र विद्यार्थ्याकडून अर्ज

मागविण्यात येत असुन इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रतीवर्षी अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.

तसेच नजिकच्या कालावधीमध्ये योजनेअंतर्गत पालकांच्या उत्पन्न मर्यादेत जागांमध्ये वाढ झाल्यास त्यानुसार जाहिरातीमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे,

सुधारणा करण्याचे व फेरअर्ज मागविण्याचे अधिकार शासन राखून ठेवीत सन २०२३-२४ या शैक्षणीक वर्षाकरिता पात्र विद्यार्थ्याकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. सदरचा अर्ज पोस्टाने किंवा समक्ष समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च रोड, पुणे ४११००१ येथे सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

योजनेचा उद्देश :- अनुसूचित जाती प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी, पदव्युत्तर पदविका आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम (पी. एच. डी.) विशेष अध्ययनाकरीता आर्थिक मदत करणे.

योजनेची व्याप्ती :- जागतीक क्रमवारीच्या अद्ययावत ३०० च्या आतील परदेशातील शैक्षणीक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजुर करणे.

याबाबतची सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील रोजगार या सदराखाली उपलब्ध करून देण्यात आलेली असल्याचेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button