अहमदनगर
माजी आमदार कर्डीले म्हणतात त्यामुळेच पुढाऱ्यांच्या पोटात दुखू लागले…

मी संचालक झाल्यानंतर जिल्हा बँक ही साखर सम्राटांन पर्यत मर्यादित न ठेवता ती बँक शेतकऱ्यांच्या दारापर्यंत नेण्याचे काम केले आहे.
कोरोणाच्या महाभयंकर संकट काळात शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून दिले होते
त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला शेतकऱ्यांनीही घेतलेले कर्ज प्रामाणिकपणे फेडले ,आता प्रत्येकी एकरी कर्ज विस हजारावरुन तीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव संचालक मंडळासमोर मांडला होता त्याला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली
मी मांडलेल्या प्रस्तावामुळे हा निर्णय निकाली लागला व जिल्ह्यातील वरिष्ठ पुढाऱ्यांच्या पोटात दुखू लागले व चेअरमन , व्हाईस चेअरमन यांनी नाईलाजास्तव प्रसिद्धी पत्रक जाहीर केले अशी टीका माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी वरिष्ठ नेत्यांचे नाव न घेता केली.