अहमदनगर

Ahmednagar News: चार दिवस अहमदनगर जिल्ह्यात मोठा बंदोबस्त; ‘या’ संवेदनशिल तालुक्यात वाढीव फौज

Ahmednagar News :अहमदनगर शहर व जिल्ह्यात 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महावीर जयंती, 15 एप्रिल रोजी गुड फ्रायडे, 16 एप्रिल रोजी हनुमान जयंती व 17 एप्रिल रोजी ईस्टर संडे हे सण- उत्सव साजरे केले जाणार आहेत.

त्या अनुषंगाने जिल्ह्यात 249 ठिकाणी प्रतिमा पुजन, 53 ठिकाणी पुतळा पुजन, 243 ठिकाणी मिरवणुक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यासाठी जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक- 2, पोलीस उपअधीक्षक- 7, पोलीस निरीक्षक- 29, सहायक पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक- 70, पोलीस अंमलदार- 1250, होमगार्ड- 400, आरसीपी- 3, एसआरपीएफ- 1, स्ट्रायकिंग फोर्स- 6, क्युआरटी- 1 अशा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आगामी सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस दल सर्तक झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर शहरासह जिल्ह्यात पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांच्या बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात विशेषत: अहमदनगर शहर, श्रीरामपूर शहर, संगमनेर शहर, नेवासा, राहुरी, जामखेड आणि नगर तालुका या संवेदनशिल तालुक्यात अधिकचा पोलीस दल, राज्य राखीव पोलीस दल यांचा बंदोबस्त देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button