अहमदनगर

चौघे आयपीएल बुकी आरोपीच्या पिंजर्‍यात; पोलिसांनी केली कारवाई

आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळविणार्‍या चौघांविरूध्द कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे. विशाल आश्‍विनकुमार आनंद (वय 25 रा. पटवर्धन चौक, अहमदनगर),

दीपक रमेश शर्मा (रा. पाईपलाइन रोड, अहमदनगर), अक्षय घोसके (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) व मोहन जोशी (पूर्ण नाव माहिती नाही. रा. तारकपूर) या बुकीवर ही कारवाई झाली आहे.

त्यांच्याविरूध्द मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकी असा 40 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलीस शिपाई अमोल गाढे यांनी फिर्याद दिली आहे.

बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पटवर्धन चौकात कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. पटवर्धन चौकात आयपीएल मॅचवर सट्टा लावला जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

त्यांनी पोलीस अंमलदार रवींद्र टकले, संतोष गोमसाळे व गाढे यांना कारवाईच्या सूचना दिल्या. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मुद्देमाल काढून दिला व इतर दोघांच्या नावाची कबूली दिली. अजून त्यांचा शोध लागलेला नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button