अहमदनगर

हल्ला व विनयभंग प्रकरणी नगर तालुक्यातील चौघांना जन्मठेप

किरकोळ कारणावरून 2014 मध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्या मदतीला आलेल्यांवर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या नगर तालुक्यातील चौघांना जन्मठेपेची, तर दोन महिला आरोपींना 3 वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे
रंजीत राठी, अभय राठी, संदीप राठी आणि गोपीनाथ गहिले, तर उषादेवी राठी व निरज राठी असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील एका गावात फिर्यादी अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. फेब्रुवारी 2014 मध्ये वादग्रस्त पाण्याच्या हैदात आरोपी आणि त्यांचे नातेवाईक पाण्याच्या टँकरमधून पाणी टाकत असतांना फिर्यादी मुलीने हैदात पाणी टाकू नका असे म्हणाल्याचा राग येवून रंजीत राठी आणि संदीप राठी आणि गोपीनाथ गहिले यांनी अल्पवयीन मुलीला शिवीगाळ करत तिचा हात पकडून तिला जवळ असणार्‍या पटांगणात नेले आणि तिचा विनयभंग केला.

मुलीचा आरडाओरड ऐकून राजकिरण विठाबा बर्डे तेथे आले आणि त्यांनी मुलीची आई कामावरून परत येईपर्यंत तिच्याशी वाद घालू नका, असे म्हटले. याचा राग धरून आरोपी रंजित राठी, संदीप राठी, हर्ष राठी आणि गोपीनाथ गहिले यांनी हातातील लोखंडी पाईप फिर्यादी व बर्डे यांच्यावर हल्ला केला. यात बर्डे याच्या डोक्यावर गंभीर जखम झाली.

या भांडणाचा आवाज ऐकून राजकिरणचा भाऊ रविकिरण बर्डे, आई मंदाकिनी बर्डे भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण करण्यात आली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यावर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.व्ही. देशपांडे यांच्या समोर सूनावणी झाली.

सर्व पुरावे साक्षी ग्राह्य धरून याप्रकरणात चौघांना जन्मठेप, अल्पवयीनचा विनयभंग प्रकरणी दोघांना चार वर्षे शिक्षा आणि दोन महिला आरोपींना तीन वर्षाची शिक्षा ठोठवली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button