अहमदनगर

प्लॉट परस्पर दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर वर्ग करून वकिलांची फसवणूक

अहमदनगर- खोटी कागदपत्रे तयार करून एका वकिलांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नियोजीत तिरूपती बालाजी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. (दुर्बल घटक) शिवाजीनगर कल्याण रोड, नगर, या संस्थेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अ‍ॅड. किशोर चंद्रकांत उपासनी (वय 54 रा. पाईपलाइन रोड, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या मालकीचा प्लॉट परस्पर दुसरे व्यक्तीच्या नावावर वर्ग करून त्यांची फसवणुक केली.

 

दिलेल्या फिर्यादीवरून नियोजीत तिरूपती बालाजी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. (दुर्बल घटक) शिवाजीनगर कल्याण रोड, नगर, शरदचंद्र नारायण लोटके, तात्कालीन चेअरमन यशवंत शिंदे, चंद्रशेखर अर्जुन शिंदे, दशरथ नरसय्या मुसकुर, सतिष चंद्रशेखर शिंदे, सध्याचे चेअरमन राम नळकांडे (सर्व रा. शिवाजीनगर कल्याण रोड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

 

1986 साली कै. सावित्रीबाई रामदास भुस्सा यांनी दुर्बल घटकातील नागरिकांकरीता स्व:ताचे मालकिचे घरे व्हावेत या उद्देशाने सहकारी संस्था स्थापन केली होती. फिर्यादी यांनी शेअर्स अनामत रक्कम जमा करून सदर संस्थेचे सभासदत्व घेतले होते. फिर्यादी यांच्या समवेत एकूण अंदाजे 288 व्यक्ती सभासद आहे. नियोजित तिरूपती बालाजी गृहनिर्माण संस्थेने जानकीराम खंडागळे यांचे मालकीची नालेगाव येथे क्षेत्र 1 हे 57 आर क्षेत्र 6 जानेवारी, 1987 रोजी खरेदी घेतली होती. सदर खरेदी खता करीता अर्जदार / फिर्यादीने व इतर सभासदांनी दिलेली जमीन खरेदी एडव्हांसची रक्कम वापरण्यात आली होती.

 

या मिळकतीमध्ये फिर्यादी हे प्लॉट नं 26 चे मालक व वहीवाटदार आहेत. सदर प्लॉट नं. 26 हा फिर्यादीचे ताब्यात होता. फिर्यादीच्या मातोश्री आजारी असल्याने फिर्यादीस सदर प्लॉट मिळकतीस लक्ष देणे शक्य झाले नाही. दरम्यानच्या काळात नियोजित तिरूपती बालाजी गृहनिर्माण संस्था मर्या, दुर्बल घटक अहमदनगर या संस्थेच्या सभासदांच्या वेळोवेळी बैठका झाल्या व मुख्य प्रवक्ता ऐवजी यशवंत शिंदे हे सदर नियोजित तिरूपती बालाजी गृहनिर्माण संस्था मर्या. (दुर्बल घटक) अहमदनगर या संस्थेचे चेअरमन म्हणुन काम पाहत होते. परंतु सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधि, नियमाअंतर्गत कधीही नोंदणी केलेली नव्हती.

 

व हल्लीचे पदाधिकारी यांनी ही सदरची संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या तरतुदीनुसार कधीही नोंदणी करून घेतलेली नाही. फिर्यादी यांनी त्याचे नावे व ताब्यात असलेला नियोजित तिरुपती बालाजी गृहनिर्माण संस्था मर्या. (दुर्बल घटक) अहमदनगर या संस्थेमधील प्लॉट नं 26 कधीही संस्थेस सरेंडर केला नाही, व कोणासही हस्तांतरीत केलेला नाही. 8 मे, 2019 रोजी फिर्यादी आपल्या मालकीचे प्लॉट मिळकतीत गेले असता सदर प्लॉट नं. 26 वर बांधकाम केलेले दिसले सदर बांधकाम कोणाचे आहे व काय हक्काने आहे याबाबत फिर्यादीने माहिती घेतली व कागदपत्रे गोळा कल असता फिर्यादीचे असे निदर्शनास आले आहे की, यातील आरोपी क्रं. 01 ते 07 यांनी संगणमत करून सन 2000 मधील स्टॅम्प पेपर रक्कम रूपये 20 चा वापर करून खोटी पैसे मिळाल्याची पावती रक्कम 15 हजारची करून सदर प्लॉट नं. 26, हा आरोपी चार चंद्रशेखर अर्जुन शिंदे याने अर्जदाराचे नाव किशोर चंद्रकांत उपासणी असताना किशोर चंद्रकांत असे करुन फिर्यादीची खोटी सही करुन त्या स्टॅम्प पेपरचे आधारे सोसायटीकडुन स्वतः चे नावावर वर्ग करून घेतला आहे. वरील सात जणांनी फिर्यादी यांची फसवणुक केल्याचे समोर आल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button