Saturday, February 24, 2024
HomeअहमदनगरAhmednagar News : दुभत्या जनावरांना मोफत टॅगिंग ! विखे पाटील पशुधन विभागामार्फत...

Ahmednagar News : दुभत्या जनावरांना मोफत टॅगिंग ! विखे पाटील पशुधन विभागामार्फत हा उपक्रम राबविणार

Ahmednagar News : दुभत्या जनावरांना मोफत टॅगिंग करण्यात येणार असून पशुधन विभागामार्फत हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी दिली.

सुपा (ता. पारनेर) येथे विखे यांनी रविवारी पत्रकारांशी संवाद साधला. दूध भेसळ हा प्रकार गंभीर आहे. त्याचा दुष्परिणाम लक्षात घेता तो थांबविण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन मोफत टॅगिंग करून घेण्याचे आवाहन विखे यांनी यावेळी केले.

शेतकऱ्यांकडील दुभत्या जनावरांच्या संख्या, त्याची दूध देण्याची क्षमता व होणारा दूध पुरवठा तपासला जाईल. त्यापेक्षा जास्त दूध जर त्याच्याकडून दिले जात असेल तर होणारी भेसळ त्यातून निदर्शनास येणार आहे, असे सांगून विखे म्हणाले,

लहान मुले, आजारी व्यक्ती, युवक, वृद्ध अशा सर्वांना दूध लागते. ते जर का भेसळयुक्त, कृत्रिम घटकांपासून केमिकल् वापरून तयार झालेले असेल तर य सर्वांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल, याचा विचार भेसळ करणारांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष् राहुल शिंदे म्हणाले, दूध भेसळीच प्रमाण वाढले असून त्याला प्रतिबंध करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाची मदत घेऊन प्रयत्न करणार आहोत.

पारनेर तालुक्यासह राहुर तालुक्यातही दूध भेसळीचे प्रमाण जास्त असल्याचे सांगून त्याला आळ घालण्यासाठी उपाययोजना राबवल्य जातील.

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठ शासनाने नुकतेच प्रतिलिटर पाच रुपय अनुदान देण्याची घोषणा केली आहे सुरुवातीला सहकारी संघासाठी ह योजना होती.

त्याची व्याप्त वाढविण्यात आली. खासगी संस्थांद्वा संकलित करणाऱ्यात येणाऱ्या दुधालाही आता अनुदान मिळणा आहे.यावेळी सुप्याचे माजी उपसरपंच दत्ता नाना पवारही उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments