आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना मिळणार कोरोना लस, अशी आहे प्रक्रिया

आजपासून 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना कोरोना लस मिळणार आहे. महाराष्ट्र राज्यात 65 लाख बालके लसीकरणासाठी पात्र आहेत. 12 ते 14 वयोगटातील मुलामुलींना कोर्बेव्हॅक्स लसचे दोन डोस देण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे दोन डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असेल. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु मोहिम राबिवण्यात येणार आहे. ही लस सर्व मुलांना मोफत दिली जाणार असून त्यासाठी CoWIN अॅपवर नोंदणी करणे अनिवार्य आहे.
अशी असणार आहे लसीकरण नोंदणी प्रक्रिया
सर्वप्रथम www.cowin.gov.in वेबसाईट ओपण करा
वेबासाईटवरती तुम्हाला नोंदणी किंवा साईन असे दोन पर्याय दिसतील, त्यापैकी एक पर्याय निवडा
दिलेल्या पर्यायात तुमचा मोबाईल नंबर टाईप करा
तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी येईल.
त्यानंतर तुम्हाला आयडी पुरावा, नाव, लिंग, आणि जन्मवर्ष अशा अनेक गोष्टी भराव्या लागतील.
सगळा अर्ज भरून झाल्यानंतर नोंदणीचं बटणावर क्लिक करावे.
त्यांच्यानंतर तुम्हाला तारिख, स्लॉट, लस घेण्याचं ठिकाण निवडून खात्री करावी लागेल.