पाच कोटींचा निधी मंजूर – आमदार शिवाजीराव कर्डिले

महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून राहुरी तालुक्यात सन २०२३-२४ मध्ये विविध विभागांमार्फत सुमारे ४ कोटी ७५ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.
राहुरी तालुक्यात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ५०५४ बजेट रस्ता मधून ५० लक्ष, ३०५४ मधून ३० लक्ष, खासदार निधी अंतर्गत १ कोटी, क वर्ग तीर्थक्षेत्र निधी अंतर्गत २५ लक्ष, नागरी सुविधा अंतर्गत ५० लक्ष, नवीन शाळा खोलीकरिता ४८ लाख, नवीन अंगणवाडी इमारत करीता १२ लक्ष,
नवीन वीज रोहित्र बसविणे या कामासाठी ६० लक्ष तसेच पर्यटन तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत कणगर, म्हैसगाव, राहुरी बु., मोमीन आखाडा आदी ठिकाणी १ कोटी रुपये असा एकूण सुमारे ४ कोटी ७५ लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी मिळाली आहे.
तसेच २५ गावांसाठी नवीन घंटागाडी, २५ गावांसाठी सोलर स्ट्रीट लाईट आदी कामासाठी निधी प्राप्त झाला आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजना अंतर्गत १७ कोटी ७९ लाख रुपयांची विकास कामे सुरू आहेत, असे कर्डिले यांनी सांगितले.
राहुरी तालुक्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून तसेच शिवाजीराव कर्डिले यांच्या विशेष प्रयत्नातून इतक्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाल्याबद्दल नागरिकांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.