अहमदनगर

बाळासाहेब थोरातांच्या प्रयत्नातून व्यायाम साहित्यासाठी २ कोटी ५६ लाखांचा निधी

सहकार, समाजकारण, शिक्षण, आर्थिक संपन्नता, सांस्कृतिक वातावरण आणि ग्रामीण विकास क्षेत्रात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील २३ गावांतील युवकांना व्यायाम साहित्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत २ कोटी ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात यांनी दिली.

ते म्हणाले, मंत्री थोरात यांनी तालुक्यातील गावच्या विकासासाठी अनेकविध योजना राबवल्या. तरुणांना चांगले शिक्षण व करिअरच्या दृष्टीने त्यांनी सुविधा निर्माण केल्या.

आरोग्याच्या दृष्टीने तरुणांसाठी जिल्हा क्रीडा योजनेतंर्गत क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून व्यायाम साहित्यासाठी फिजिकल फिटनेस विथ रिक्रिएशन या संकल्पनेवर आधारित योजनेतून २ कोटी ५६ हजार रुपयांचा निधी मिळवला आहे.

तालुक्यातील अंभोरे, आश्वी, कासारा दुमाला, गुंजाळवाडी, घुलेवाडी, जवळेकडलग, जोर्वे, तळेगाव, धांदरफळ, निमगाव, वडगावपान, साकुर, सुकेवाडी तर शहरातील तिवारी मळा, नाशिक रोड, संजीवन सोसायटी, मालदाड रोड, मेहर मळा, गुंजाळ आखाडा, कुरण रोड, पंचायत समिती रोड, कासट मळा, अकोले रोड,

कवी अनंत फंदी नाट्यगृह आदी ठिकाणी साहित्य देण्यात येणार आहे. यामुळे तरुणांना व्यायामाची चांगली सुविधा उपलब्ध होणार असून आरोग्याच्या दृष्टीने दिशादर्शक पाऊल टाकण्यात आले आहे. तरुणांनी मंत्री थोरात व जिल्हा परिषद सदस्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button