Ahmednagar Betting on IPL : आयपीएलवर सट्टा खेळविणारा गजाआड…

Ahmednagar Betting on IPL : आयपीएल क्रिकेट मॅचवर सट्टा खेळविणारा नदीम बाबासाहब शेख (वय 27, पिरशाह खुंट, डावरे गल्ली) याला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. शहरातील पिरशहा खुंट येथे पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.
याप्रकरणी पोलीस अंमलदार अभय रामचंद्र कदम यांनी फिर्याद दिली असून, शेख विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजलक्ष्मी स्टेशनर्सजवळ जुना कापड बाजार रोडवर पिरशहा खुंट येथे एक व्यक्ती आयपीएल क्रिकेट करीता मोबाईल फोनद्वारे लोकांकडून पैसे घेवून
त्यांना मोबाईल फोनवर आयडी व पासवर्ड देत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार पोलीस अंमलदार कदम, गणेश धीत्रे, सलिम शेख, अतुल काजळे यांनी छापा टाकला.
यावेळी नदीम शेख हा सट्टा खेळवत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडून 15 हजार 650 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.