पहाटे सुरू होता जुगार; पोलिसांनी मारला छापा

डायल 112 नंबरवर जुगार सुरू असल्याची माहिती आली आणि कोतवाली पोलिसांनी लगेच कारवाई करत छापेमारी केली. शहरातील कायनेटीक चौकात आज पहाटे केलेल्या कारवाईत 11 जुगारी पकडले.
त्यांच्याकडून 18 हजार 250 रूपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. साबीर असयुब शेख, फिरोज खान सुलेमान खान (दोघे रा. तख्ती दरवाजा), सचिन प्रभाकर परदेशी (रा. बुर्हाणनगर), सुरेश शिवदास ननवरे (रा. कायनेटीक चौक), मोसीन इसा मुद्दीन शेख (रा. आशा टॉकीज), सोफीया रऊफ शेख (रा. फलटन चौकी),
जाहीद जाकीर शेख, निशांत राजू इनामदार (दोघे रा. मुंकुदनगर), अक्षय सुनील गायकवाड (रा. सारसनगर), अमित बाळासाहेब चिंतामणी (रा. तेलीखुंट), जावेद पिरमहम्मद सय्यद (रा. फकीरवाडा) अशी पकडलेल्या जुगारींची नावे आहेत.
पोलीस शिपाई संदीप थोरात यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 11 जुगारीविरूध्द महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.