अहमदनगरलेटेस्ट

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणच्या गणेशमूर्तीं पोहोचल्या थेट लंडनला !

श्रावण महिना लागला की घराघरातून वेध लागतात ते गणरायाच्या आगमनाचे. अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी शहरात तयार होणाऱ्या गणेशमूर्तींना आता थेट विदेशातूनही मागणी येवू लागली आहे.

नुकत्याच एक हजार मूर्ती लंडनला पाठविण्यात आल्या आहेत. विदेशातून मागणी वाढल्याने मोबदलाही चांगलाच मिळतो आहे.

पाथर्डी शहरातील मूर्तींना लंडन, थायलंड व मॉरिशस येथून मागणी आहे. लॉकडाउन असतानाही मागणी कमी न होता वाढली आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना चांगली मागणी आहे.

स्थानिक दर व विदेशातील विक्रेचे दर यांच्या तुलनेत विदेशात किंमत ही उत्तम मिळत आहे. येथील रघुनाथ पारखे १९७० पासून गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करतात. त्यांना मुलगा संजय व नातू अनिल मदत करतात.

अनिल यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट संस्थेतून शिल्पकलेची पदवी घेतली आहे. काळ बदलला तसा गणपती तयार करण्याच्या पद्धतीत बदल झाला. आता थ्रीडी कलर गणशमूर्तींची नवी संकल्पना पुढे येत आहे.

रंग देण्यासाठी आधुनिक यंत्र वापरले जात आहेत. त्यामुळे पारंपरिक कलेला आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागत आहे. पारखे यांनी या वर्षी एक हजार गणेशमूर्ती लंडन येथे पाठविल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button