Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरलसणाचा तडका महागला...! गवार २०० तर लसूण ४०० रूपये किलो

लसणाचा तडका महागला…! गवार २०० तर लसूण ४०० रूपये किलो

अहमदनगर : यंदा मान्सूनच्या पावसाने ऐनवेळी दगा दिल्याने इतर पिकांसोबतच लसणाची देखील लागवड कमी प्रमाणात झाली होती. परिणामी उत्पादनाम मोठी तूट आली आहे. त्यातच परत आक्टोबर नोव्हेंबरमध्ये अवकाळीचा फटका बसला.

त्यात देखील मोठ्या प्रमाणावर शेतमालाचे नुकसान झाले, यात लसणाचे देखील पीक भुईसपाट झाले होते. त्यामुळे यंदा लसणाचे उत्पादन कमी झाले असून अद्याप नवीन लसूण बाजारात येण्यास कालावधी लागणार आहे.

त्यामुळे बाजारात लसणाला मोठ्या प्रमाणावर मागणी वाढल्याने लसणाचे दर चांगलेच वाढलेले आहेत. किरकोळ बाजारात तब्बल ४०० रूपये भाव मिळत आहे. त्यापाठोपाठ गवारीच्या शेंगाला २०० रूपये किलोने विकल्या जात आहेत.

शेतकऱ्यांच्या हातात मात्र अत्यंत कमी पैसे मिळत आहेत. त्यामुळे दर वाढून देखील शेतकरी उपाशीच असल्याचे चित्र आहे.

ठोक भाव : टोमॅटो १००० – ३०००, वांगी ५०० – ३०००, फ्लावर ५०० – २०००, कोबी ५०० – १५००, काकडी ५०० – २०००, गवार ७००० – १४०००, घोसाळे ५०० – ४०००, दोडका ३००० – ४०००, कारले १००० – ४०००, भेंडी १००० – ५०००, वाल २००० – ३५००, घेवडा १५०० – ३५००, तोंडुळे १५०० – २०००, डिंगरी २००० – २५००, बटाटे ५०० – १६००, लसूण ९००० – २००००, हिरवी मिरची १५०० – ४५००, आवळा २००० – ३०००, शेवगा ३००० – ७०००, लिंबू १५०० – ५०००, आद्रक ६००० – ७५००, दु.भोपळा ३०० – १५००, शिमला मिरची १००० – ४५००, मेथी ६०० – १०००, कोथिंबीर ९०० – १८००, पालक ६०० – १४००, मुळे २००० – २०००, कांदा पात १२०० – १२००.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments