अहमदनगर
राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी जमलेल्या गर्दीत चोरट्यांची हातसफाई; साडेआठ तोळ्याची…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अहमदनगर शहरात स्वागत करण्यासाठी जमलेल्या गर्दीचा चोरट्यांनी फायदा घेतला.
एका व्यक्तीच्या गळ्यातील साडेआठ तोळे वजनाची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास अहमदनगर शहरातील माळीवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ही घटना घडली.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात प्रमोद रमेशलाल मुथ्था (वय 48 रा. अपुर्वा अपार्टमेंट, नंदनवन काॅलनी, बुरूडगाव रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.