अहमदनगरताज्या बातम्यासंगमनेर

Gautami Patil In Ahmednagar | गौतमी पाटील ची अहमदनगर मध्ये हवा ! चक्क स्टेज सोडून खाली आली आणि…

Gautami Patil In Ahmednagar :- ग्रामीण भागात गौतमी पाटीलची लोकप्रियता खूपच जास्त आहे, प्रसिध्द नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे सूत्रच बनलं आहे.मात्र अहमदनगर जिल्ह्यात वेगळा प्रकार पाहायला मिळाला आहे

संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी येथे कला व सास्कृतिक मोहोत्सव निमित्ताने रिलस्टार गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे शनिवारी (१३ मे) रोजी आयोजन करण्यात आले होते.गौतमी पाटीलचे नृत्य पाहण्यासाठी आजुबाजूच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला महिला प्रेक्षकांची संख्याही लक्षणीय होती.

नेहमी स्टेजवर आपल्या डान्सनं सर्वांना घायाळ करणाऱ्या गौतमी पाटीलनं यावेळी थेट स्टेजवरून खाली उतरत महिला प्रेक्षकांमध्येच एंट्री घेतली. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्याचं पाहायला मिळालं.

गौतमीनं फिल्मी अंदाजात एंट्रीने महिलांनी देखील ठेका घरला. मात्र या कार्यक्रमानंतर गौतमी पाटीलच्या शोची वेगळीच चर्चा रंगली होती. हा कार्यक्रम कुठलाही तंटा, भांडणे न होता निर्विघ्न पार पडला. त्यामुळे या कार्यक्रमाची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.

म्हसवंडी म्हणजे महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा जल आकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले गाव होय. येथे कला व सास्कृतिक मोहोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त रील स्टार गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गौतमी पाटीलच्या आतापर्यंत जवळपास सर्व कार्यक्रमामध्ये राडा होताना पाहायला मिळाला. कुठेही कार्यक्रम असला की कार्यक्रम मधूनच बंद करायला लागत असे मात्र या कार्यक्रमात मात्र संपूर्ण गावाने सहभाग घेत तिच्या कार्यक्रमाला दाद दिली. गौतमी नाचता नाचता मध्येच स्टेजवरून खाली उतरली.

पहा व्हिडीओ लिंकवर

शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली, लग्न झालेल्या बायका ते म्हाताऱ्या आजी देखील गौतमीचा डान्स पाहण्यासाठी आल्या होत्या. गौतमीनं स्टेजवरून प्रेक्षकांमध्ये एंट्री घेतली. गौतमी खाली उतरताच महिला प्रेक्षकांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळाला.

स्टेजवरून खाली उतरताच गौतमीनं चंद्रा गाण्यावर ठेका धरला. चंद्रा गाण्यावर बेधुंद नाचणाऱ्या गौतमीसमवेत शाळा- कॉलेजात जाणाऱ्या मुली, लग्न झालेल्या बायका ते म्हाताऱ्या यांनीही ठेकाधरत नाचायला सुरवात केली. त्यांना आवराण्यात घारगाव पोलिसांना तर दमछाक झाली. या कार्यक्रमासाठी पोलीस बंदोबस्त तसेच खाजगी बॉडीगार्ड यांचेही नियोजन केलं होतं.

या कार्यक्रमात गौतमीसोबत गावातील तरुणाईसह चिमुकल्यांनीही ठेका धरला. यावेळी गौतमीने चिमुकल्यांना स्टेजवर बोलवत त्यांच्यासोबत डान्स केला. ग्रामस्थांचं योग्य नियोजन आणि तरुणाईच्या समंजसपणामुळं गौतमी पाटीलचा कार्यक्रम शांततेत पार पडला.

  • अहमदनगर ब्रेकिंग न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
  • अहमदनगरच्या आणखी बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
  • तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि ट्विटर वर फॉलो करा

Related Articles

Leave a Reply

Back to top button