बाजारभाव

घोडेगाव कांदा मार्केटला कांद्याची आवक वाढली; मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारी कांद्याचे जास्तीत जास्त भाव 1800 रुपयांपर्यंत स्थिर होते. दरम्यान कांद्याची 71 हजार 485 गोण्या आवक झाली. बुधवारच्या तुलनेत आवक 21 हजार गोण्यांनी अधिक झाली.

एक-दोन लॉटला 1600 ते 1800 रुपये भाव मिळाला. मोठा कलरपत्ती कांद्याला 1300 ते 1500 रुपये, मुक्कल भारी कांद्याला 1100 ते 1300 रुपये, गोल्टा कांद्याला 800 ते 1000 रुपये, गोल्टी कांद्याला 300 ते 800 रुपये, जोड कांद्याला 200 ते 550 रुपये तर हलक्या डॅमेज कांद्याला 100 ते 400 रुपये भाव मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button