Saturday, February 24, 2024
Homeअहमदनगरओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या !

ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या !

Ahmednagar News : महाराष्ट्रातील ओबीसी समाज झोपेत असतानाच जातीयवादी सरकारने व मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण बाबत जो जीआर काढला,

त्याचा आम्ही निषेध करतो. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, असे प्रतिपादन समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे यांनी केले.

मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याला ओबीसी समाजाच्या वतीने तीव्र विरोध केला जात आहे.

काल गुरूवारी (दि.१) राहुरी येथील ओबीसी समाजाच्या वतीने मोर्चा काढून तहसील मिलिंद कुलथे यांना निवेदन देण्यात आले.

त्यात म्हटले आहे कि, मराठा समाजाला मराठा आरक्षण अंतर्गत सगेसोयरे या धर्तीवर मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जीआरनुसार आश्वासीत केले. यामुळे ओबीसी समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले.

सरकारचा हा निर्णय मूळ ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे घटनाबाह्य आहे.

मराठा समाजाच्या बेकायदेशीर आंदोलनाच्या दबावाखाली राज्यातल्या प्रस्थापित जमिनदारांना मागास ठरविण्याचे षडयंत्र केले जात आहे.

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी तयार करण्यात आलेली प्रश्नावली चुकीची आणि आक्षेपार्ह पद्धतीने तयार केली आहे. सरकारने मूळ ओबीसी समाजाचा विचार करून मराठा आरक्षण सगेसोयरे संदर्भात काढलेला जीआर त्वरीत रद्द करावा.

आणि शिंदे समितीच्या माध्यमातून वितरीत करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे कोणत्याही आजीला कोणत्याही शासकीय घेऊ देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी शरद बाचकर, डॉ. धनंजय मेहेत्रे, विजय तमनर, संदिप रासकर, कल्याण राऊत आदीनी मनोगत व्यक्त केले. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये. आरक्षण द्यायचेच असेल तर ओबीसी समाजाला धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्यावे,

अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. तसेच उद्या (दि.३) फेब्रुवारी रोजी ओबीसी नेते, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments