अहमदनगर

पोलीस चौकीच्या हद्दीतच सोनसाखळी चोरट्यांचे पोलिसांना आव्हान

नगर ‘शहरातील कोतवाली व तोफखाना हद्दीत सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दोन घटनेत एक लाख 20 हजार रुपये किमतीच्या चार तोळे सोन्याच्या चेन दुचाकीवरील चोरट्यांनी लंपास केल्या. यामुळे पोलीस यंत्रणेपुढे या चोरांच्या मुसक्या आवळणे हे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. .

पहिली घटना

फिर्यादी शशिकला भंडारे व मंगल सोमाणी या दोघी बुरूडगाव रोडवरील स्वाती कॉलनीमध्ये पायी फिरत होत्या. समोरून पल्सर दुचाकीवरून आलेल्या

दोघांनी फिर्यादी भंडारे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची दोन पदरी चेन बळजबरीने ओढून तोडून नेली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना

दुसर्‍या घटनेत रस्त्याने पायी जाणार्‍या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रूपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लंपास केली.

सावेडी उपनगरातील आराधना संगितालय, किंग्ज कॉर्नर, रासनेनगर येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा प्रकाश कंठाळे (वय 55 रा. अजिंक्य कॉलनी, बोरूडे मळा, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button