Gold Price Today : ग्राहकांसाठी गुड न्युज ! सोने चांदीचे भाव पुन्हा घसरले, जाणून घ्या आजचा 10 ग्रॅमचा दर
आज सोने व चांदीचे दर घसरले आहेत. ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही 10 ग्राम सोने स्वस्तात खरेदी करू शकता.

Gold Price Today : देशात दिवसोंदिवस सोने व चांदीची मागणी वाढत आहे. अशा वेळी आज आम्ही तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करणार असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
कारण आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवण्यात आली आहे. अशा वेळी दहा ग्रॅम सोने 59,240 रुपयांवर स्वस्त झाले आहे. तर एक किलो चांदीचे दरही खाली आले असून आता 71,250 रुपयांना विकले जात आहेत. याबाबत एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.
दरम्यान, शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव 110 रुपयांनी घसरून 59,240 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात सोन्याचा भाव 59,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता.
आज चांदी कितीवर पोहोचली आहे?
त्याचप्रमाणे दिल्लीत चांदीचा भावही 600 रुपयांनी घसरून 71,500 रुपये प्रति किलो झाला. HDFC सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी म्हणाले, “दिल्ली सराफा बाजारात स्पॉट सोन्याचा भाव 110 रुपयांनी घसरून 59,240 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
परदेशी बाजारात सोन्याची घसरण
विदेशी बाजारात, सोने आणि चांदी अनुक्रमे US $ 1,915 प्रति औंस आणि US $ 22.70 प्रति औंसवर व्यवहार करत होते.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याचे दर जाणून घ्या
विशेष म्हणजे हे दर तुम्ही घरबसल्या सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या नंबरवर मिस कॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर एक मेसेज येईल, ज्यामध्ये तुम्ही नवीनतम दर पाहू शकता.
मे महिन्यात हिरे आणि दागिन्यांची निर्यात 10.7% कमी झाली
मे महिन्यात हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात 10.7 टक्क्यांनी घसरून 22,693.41 कोटी रुपये ($2,755.9 दशलक्ष) झाली. अलीकडेच, उद्योग संस्था जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल म्हणजेच GJEPC ने त्यांच्या वेबसाइटवर सादर केलेल्या मासिक डेटामध्ये ही माहिती दिली आहे. यानुसार, गेल्या वर्षी मे महिन्यात रत्न आणि दागिन्यांची निर्यात 25,412.66 कोटी रुपये ($328.54 दशलक्ष) होती.