अहमदनगर

अहमदनगरकरासाठी सुखद बातमी ! जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये गर्दी होतेय कमी…

अहमदनगर करांसाठी सुखद अशी बातमी आहे, कारण जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आता कमी होत असून त्या पाठोपाठ सक्रीय रुग्ण संख्या कमी होत असल्याने जिल्ह्यातील ठीक ठिकाणाचे कोविड सेंटर मध्ये होणारी गर्दी कमी होते आहे.

गेले दोन महिने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. या अडीच महिन्यांत सुमारे दीड लाख बाधित सापडले. खासगी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणेने रात्रं-दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करून रुग्णांना बरे केले. आता मात्र कोविड केअर सेंटर रिकामे होऊ लागली आहेत.

कोविड केअर सेंटर होताहेत रिकामे
रविवारी १,१४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ४६ हजार १८७ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.२४ टक्के आहे. दरम्यान, रविवारी रुग्णसंख्येत १,४४० ने वाढ झाली.

सध्या उपचार सुरू असणाऱ्यांची संख्या ११ हजार ८६३ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४६५, खासगी प्रयोगशाळेत ५७७ आणि अँटीजेन चाचणीत ३९८ बाधित आढळले. दिवसभरात ६१ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयातील नोडल अधिकाऱ्यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button