अहमदनगर

शेतकऱ्यांसाठी खुशखबर: ‘या’ तारखेपर्यंत भरू शकता प्रधानमंत्री पीक विमा

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांना कमी विमा रक्कमेमध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. या पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकर्‍यांनी 31 जूलै 2022 पर्यंत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप यांनी केले आहे. जिल्ह्यातील 10 पिकांसाठी चार लाख 30 हजार 323 हेक्टर शेतीक्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी भरावी लागेल रक्कम: भात (तांदुळ) प्रति हेक्टर 1035.20 रूपये हप्ता, बाजरी प्रतिहेक्टर 678.26 रूपये हप्ता, भुईमूग प्रतिहेक्टर 760 रूपये हप्ता, सोयाबीन प्रतिहेक्टर 1145.34 रूपये हप्ता, मूग प्रतिहेक्टर 400 रूपये हप्ता, तूर प्रतिहेक्टर 736.04 रूपये हप्ता, उडीद प्रतिहेक्टर 400 रूपये हप्ता, कापूस प्रतिहेक्टर 2999.15 रूपये हप्ता, मका प्रतिहेक्टर 711.96 रूपये हप्ता, कांदा पिकासाठी 11 तालुक्यातील 80 हजार हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित करण्यात आले असून प्रति हेक्टर 4000 रूपये हप्ता रक्कम भरावी लागेल

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकर्‍यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकर्‍यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे योजनेचे उद्दष्टि आहे. राज्यात 2016 पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवलिी जाते. अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी ही योजना आहे. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठी ऐच्छिक आहे. खातेदार शेतकर्‍यांबरोबर कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. शेतकर्‍यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे. विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही एक वर्ष कालावधीसाठी राहणार आहे.

खरीप हंगाम करिता हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान इत्यादी गोष्टींचा योजनेच्या जोखमीच्या बाबींमध्ये समावेश या पिक विमामध्ये करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button