अहमदनगरकर्जतताज्या बातम्यापारनेरश्रीगोंदा

श्रीगोंदा, शिरूर, कर्जत, पारनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी

मागील काही दिवसांपासून होणाऱ्या पावसाने घोड धरण शनिवारी (दि. ३०) सकाळी ओव्हरफ्लो झाले कुकडी प्रकल्पातील पाणीसाठा नव्वद टक्क्यांवर गेला आहे.

याचा फायदा श्रीगोंदा, शिरूर, कर्जत, पारनेर तालुक्यांतील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच घोडगंगा, नागवडे, अंबालिका, कुकडी, गौरी, साजन शुगर आदी साखर कारखान्यांची चक्रे फिरण्यास मदत होणार आहे.

घोड धरणाचा १९६७ पासूनचा मागोवा घेतला

Advertisement

असता ५५ पैकी ४८ वेळा ते भरले. सन २०००, २००१, २००२ २००३ २००९, २०१२, २०१५ यावर्षी भरलेले नाही. यंदाही हंगामाचे अगदी साडेतीन महिने घोड धरणात अत्यल्प साठा होता.

धरण १०० टक्के भरते की नाही याबाबत साशंकता होती. मात्र, मागील आठ दिवसांतील पावसाने चित्र बदलले. मोठ्या प्रमाणावर पाऊस धरणाच्या पाणलोटात झाला. पाण्याची मोठी आवक घोड धरणात झाली अन् ते शनिवारी सकाळी शंभर टक्के भरले.

त्यानंतर घोड नदी पात्रात एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे ओस पडलेल्या घोड पात्रात पाणी आले. नदी पात्रातील पाच बंधारे भरले आहेत.

Advertisement

तसेच कुकडी प्रकल्पातील माणिकडोह, येडगाव वगळता इतर धरणेही भरली आहेत आवर्तन सोडल्याने येडगावचा पाणीसाठा कमी झाला होता.

शेतकन्यांसाठी येडगाव, घोडमधून पाणी सोडण्यात आले होते. त्यातच पावसाने दडी मारली. त्यामुळे यंदा अडचण निर्माण होते की काय याबाबत शंका येत होती. मात्र परतीच्या मान्सूनने दिलासा दिला.

कुकडीतील बहुतांश धरणे, तसेच घोड़ धरण ओव्हरफ्लो झाले. आता कृषी, औद्योगिक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावणार नाही. -किरण देशमुख, कार्यकारी अभियंता, कुकडी प्रकल्प विभाग क्रमांक- २ श्रीगोंदा.

Advertisement

विसापूरमध्ये पाणी सोडणार

कुकडी प्रकल्पातील धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. येडगाव धरणाच्या कालव्यातुन १ ऑक्टोबरपासून विसापूर तलावासह इतर रिकाम्या तलावांमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे.

या संदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता हेमंत धुमाळ यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.

Advertisement
  • अहमदनगर ब्रेकिंग न्यूजच्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
  • अहमदनगरच्या आणखी बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
  • तसेच आमचे फेसबुक पेज लाईक करा आणि ट्विटर वर फॉलो करा

Related Articles

Leave a Reply

Back to top button