अहमदनगरताज्या बातम्या

Good News : वेतन १ तारखेला झाल्याने शिक्षकांमध्ये आनंदोत्सव

जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टम यांनी याबाबत तत्काळ अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि त्यानुसार सप्टेंबर पेड ऑक्टोबरचे वेतन १ ऑक्टोबर रोजी झाल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Good News : कर्मचाऱ्यांना नेहमीच आपला पगार वेळेवर व १ तारखेलाच व्हावा, ही एकच अपेक्षा असते. याबाबत प्रशासनाला संघटनांकडून वेळोवेळी निवेदन देण्यात येतात.

जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टम यांनी याबाबत तत्काळ अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि त्यानुसार सप्टेंबर पेड ऑक्टोबरचे वेतन १ ऑक्टोबर रोजी झाल्याने शिक्षकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात बारा हजारांहून अधिक प्राथमिक शिक्षक आहेत. यापूर्वी शिक्षकांचे पगार तालुकानिहाय वेगवेगळ्या तारखांना होत होते. यात कधी पंधरा ते वीस तारखेपर्यंतही वेळ जात होता.

Advertisement

परंतु, आता जिल्हा परिषदेच्या पीएफएमएस प्रणालीद्वारे शिक्षकांचे पगार १ तारखेला जमा करण्यात आले आहेत. सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या खात्यात रविवारी सकाळी ९ वाजता वेतन अदा करण्यात आले.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे यांनी त्यांच्या अधिनस्थ टीमला एक रूपरेषा ठरवून दिली व त्याचे फलित म्हणजे १ तारखेला रविवार सुट्टी असूनही जवळपास बारा हजार शिक्षकांच्या बँक खात्यात वेतन जमा झाले.

उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडझोडे, झेडपी एफएमएसचे राज्य समन्वयक राजेंद्र डोंगरे यांच्या तांत्रिक सहकार्याने अमोल राऊत, तंत्रस्नेही योगेश पंधारे,

Advertisement

उमाकांत भांड, महंमद शेख यांच्या टीमने वेतन अदा करण्याची कार्यवाही केली. दरम्यान, वेतनाबाबत कार्यवाही झाली असल्याने पीएफएमएस प्रणालीबाबत विश्वासार्हता वाढत असून, प्राथमिक शिक्षक संघटनांकडून सर्वांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button