Google Chrome : गुगल क्रोमवर सेव्ह किंवा बुकमार्क केलेले दुसऱ्या वेब ब्राउझरमध्ये कसे घ्यायचे? जाणून घ्या ही पद्धत
तुम्ही Google Chrome वापरत असल्यास, महत्त्वाच्या वेबसाइट्सला भेट देणे सोपे करण्यासाठी तुम्ही अनेक वेळा बुकमार्क वापरले असतील.

Google Chrome : देशात जवळपास अनेकजण महत्वाच्या कामांसाठी गुगल क्रोम वापरत असतात. गुगल क्रोममध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेबसाइट उघडून तुमची कामे करू शकता.
अशा वेळी जे दररोज गुगल क्रोम वापरत असतात, असे लोक त्यांच्या महत्वाच्या वेबसाइटला वारंवार भेट देत असतात. एकाच वेबसाइटला भेट देण्यासाठी सतत तुम्ही ती वेबसाइट ओपन करणार असाल तुमचा खूप वेळ जातो.
मात्र वेब ब्राउझरवर बुकमार्कची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे बुकमार्कमध्ये वेबसाइट जोडल्याने वापरकर्त्याचे काम सोपे होते. तसेच तुम्हाला सतत गरजेची असणारी वेबसाइट तुम्ही लगेच चालू करू शकता.
Google Chrome बुकमार्क कधी हटवले जातात?
कधी कधी तुमच्या लॅपटॉप किंवा वेब ब्राउझरवर अडचण येते. कामाच्या वेबसाइटचे हे सर्व बुकमार्क पीसी किंवा ब्राउझर बदलल्यानंतर हटवले जातात. जर तुम्ही क्रोम ब्राउझरवर बुकमार्क ठेवत असाल तर ही माहिती तुमच्या उपयोगी पडू शकते. कारण आज आम्ही तुम्हाला Google Chrome बुकमार्क दुसर्या वेब ब्राउझरवर कसे घ्यायचे याबद्दल सांगणार आहोत.
बुकमार्क शेयर करण्यासाठी कोणती सेटिंग्ज उपलब्ध आहेत?
वास्तविक, बुकमार्कचा बॅकअप घेण्याची सुविधा गुगल क्रोमवरही उपलब्ध आहे. Chrome ब्राउझरचा बॅकअप तयार होताच, तो फाइल सिस्टममध्ये सेव्ह केला जातो. ही बुकमार्क फाईल दुसर्या ब्राउझरवर ट्रांसफर करण्याव्यतिरिक्त, तुम्ही ती दुसर्या यूजर्सला देखील शेयर करू शकता.
Google Chrome बुकमार्क दुसर्या वेब ब्राउझरवर कसे हस्तांतरित करावे?
यासाठी सर्वप्रथम गुगल क्रोम पीसीवर ओपन करावे लागेल.
येथे तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात बनवलेल्या थ्री डॉट पर्यायावर टॅप करावे लागेल.
येथे दिसत असलेल्या यादीमध्ये, तुम्हाला बुकमार्कच्या पर्यायावर टॅप करावे लागेल.
बुकमार्कच्या पर्यायावर फक्त बुकमार्क मॅनेजरच्या पर्यायावर टॅप करावे लागेल.
येथे पुन्हा तुम्हाला वरच्या उजव्या कोपर्यात बनवलेल्या तीन बिंदू पर्यायावर टॅप करावे लागेल.
येथे तुम्हाला एक्सपोर्ट बुकमार्क वर टॅप करावे लागेल.
बुकमार्कवर टॅप केल्याने बॅकअप सिस्टममध्ये सेव्ह होईल.
हा बॅकअप व्हॉट्सअॅपच्या मदतीने इतर वापरकर्त्यांसोबत शेअर केला जाऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही तुमचे हे काम अधिक सोप्पे करू शकता.