Government Job : सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ 15 भाषांमध्ये होणार परीक्षा…
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. कारण आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी 15 भाषांमध्ये परीक्षा देऊ शकणार आहेत.

Government Job : देशात लाखोंच्या संख्येत तरुण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. अशा वेळी सरकार नियमांत वेळोवेळी बदल करत असते, ज्याचा फायदा तरुणांना होत असतो.
जर तुम्हीही सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.कारण आता उमेदवार त्यांच्या स्थानिक भाषेत कोणतीही केंद्र सरकारची परीक्षा देऊ शकतात.
याबाबत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितले की, देशातील तरुणांच्या नोकरीच्या संधी जाऊ नयेत म्हणून केंद्राने एसएससीद्वारे घेण्यात येणारी सरकारी नोकरी भरती परीक्षा 15 भाषांमध्ये घेण्याचा निर्णय त्यांनी कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या 14 व्या हिंदी सलाहकार समितीच्या बैठकीत घेतला आहे.
सरकारी नोकरीची परीक्षा 15 भारतीय भाषांमध्ये असणार आहे
कार्मिक राज्यमंत्री सिंह म्हणाले, “अलीकडेच 15 भारतीय भाषांमध्ये सरकारी नोकरीच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे जेणेकरून देशातील कोणताही तरुण भाषेच्या अडथळ्यामुळे नोकरीच्या संधी गमावू नये.” तसेच यामध्ये हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, पेपर 13 प्रादेशिक भाषांमध्ये म्हणजे आसामी, बंगाली, गुजराती, मराठी, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, उड़िया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोकणी या भाषांमध्ये पेपर सेट केले जाईल.
तसेच यावेळी बोलताना ते म्हणाले की, “गेल्या नऊ वर्षांत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, अधिकृत भाषा हिंदी व्यतिरिक्त भारतीय प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी लक्षणीय प्रगती झाली आहे.” तसेच या निर्णयामुळे लाखो उमेदवार त्यांच्या मातृभाषेतून/प्रादेशिक भाषेत परीक्षेला बसतील आणि त्यांच्या निवडीची शक्यता सुधारेल, असे ते म्हणाले आहेत.
JEE, NEET आणि UGC या परीक्षा 12 भाषांमध्ये होत आहेत
दरम्यान, जेईई, नीट आणि यूजीसी परीक्षाही आमच्या 12 भाषांमध्ये घेतल्या जात आहेत. UPSC मध्ये अजूनही उच्च शिक्षणावरील पुस्तकांची कमतरता आहे, परंतु भारतीय भाषांमधील विशेष पुस्तकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण मंत्रालयाच्या समन्वयाने प्रयत्न सुरू आहेत.
देशातील पहिला एमबीबीएसचा हिंदी अभ्यासक्रम गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भोपाळ, मध्य प्रदेश येथे सुरू करण्यात आला होता. आणि आता उत्तराखंड हे हिंदीमध्ये एमबीबीएस अभ्यासक्रम सुरू करणारे दुसरे राज्य बनले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून दिले जाईल
पंतप्रधान मोदी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (नेट) प्राथमिक, तांत्रिक आणि वैद्यकीय शिक्षणात विद्यार्थ्यांच्या मातृभाषेला महत्त्व देऊन अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. “पंतप्रधान मोदींनी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम, गुजराती, बंगाली या प्रादेशिक भाषांमध्ये वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण देण्याचे आवाहन केले आहे.
वैद्यकीय शिक्षण हिंदीतून सुरू झाले असून लवकरच अभियांत्रिकीचे शिक्षणही हिंदीतून सुरू होणार असून अभियांत्रिकीच्या पुस्तकांचे भाषांतरही केले जाणार असल्याने सिंग यांनी यावेळी सांगितले आहे.