पोहण्यासाठी गेलेल्या ‘त्या’ तरुणांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना आढळून आला

नेवासा तालुक्यातील खुपटी येथे दोन दिवसांपुर्वी प्रवरानदी पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्युदेह शनिवार दि.16 रोजी प्रवरानदीच्या पाण्यात तरंगतांना आढळून आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नेवासा तालुक्यातील खुपटी येथील महादेव मंदिर परिसरातील प्रवरा नदीपात्राच्या पाण्यात खुपटी गावातील दिपक प्रकाश घोरपडे (वय 30 वर्षे) व प्रविण पावलस ठुबे (वय 30 वर्षे) हे दोघे मित्र पोहण्यासाठी गेलेले होते. मात्र पुन्हा ते घरीच आले नाही.
आज शनिवार दि.16 रोजी गावांत दोन तरुणांचा मृत्युदेह पाण्यात तरंगतांना आढळून आल्याची चर्चा गावात पसरली. पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या या युवकांचा नदीपाञातील गाळात बुडून मृ्त्यु झाल्याची प्राथमिक माहीती हाती आलेली आहे. या घटनेबाबत अमोल पावलस ठुबे यांनी दिलेल्या खबरीवरुन नेवासा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.