अहमदनगर

ग्रामसेवकाला लाकडी दांडक्याने मारहाण; सावेडी उपनगरातील घटना

 सावेडी उपनगरात किरकोळ कारणातून ग्रामसेवकाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाळासाहेब नाना आतकर (वय 57 रा. सावेडी, अहमदनगर) असे मारहाण झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अमोल भीमराज वरखेडकर, वैशाली अमोल वरखेडकर आणि हर्ष अमोल वरखेडकर (तिघे रा. सावेडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीत म्हंटले आहे कि, अमोल वरखेडकर याने फिर्यादी आतकर यांचा मुलगा प्रसाद याला विनाकरण थांबवून,‘माझ्याकडे काय पाहतो, निट पाहायचे नाही तर खूप मारीन’, असे म्हणून दम दिला. याबाबत फिर्यादी आतकर यांनी अमोल वरखेडकर याला जाब विचारला. त्याचा राग आल्याने अमोलने आतकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली.

तसेच अमोल याची पत्नी वैशाली, मुलगा हर्ष यांनी आतकर व त्यांचा मुलगा प्रसाद यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button