अहमदनगर

गुरुपौर्णिमा उत्‍सव; साईंच्या झोळीत एवढ्या कोटींचे दान

अहमदनगर- श्री. साईबाबांच्या गुरुपौर्णिमा उत्‍सवामध्‍ये ०५ कोटी १२ लाख इतकी देणगी प्राप्‍त झाल्याची माहिती साईसंस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने यावर्षी सोमवार दि १२ जुलै २०२२ ते गुरूवार दि.१५ जुलै २०१९ या कालावधीत गुरुपौर्णिमा उत्‍सवाचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र शिर्डी येथील श्री साईबाबांच्या प्रमुख उत्सवापैकी एक असलेल्या गुरुपौर्णिमा उत्सवात देशविदेशातील लाखो साईभक्तांनी साईदरबारीहजेरी लावत साईबाबांचे मनोभावे दर्शन घेतले. या तीन दिवसीय उत्सवात साईबाबांच्या झोळीत भरभरून दान टाकले.

यामध्ये दक्षिणापेटी मोजणी, देणगी काऊंटर, डेबीट-क्रेडीट कार्ड, ऑनलाईन, चेक-डी.डी., मनी ऑर्डर देणगी, १२ देशांचे परकिय चलन यांचा समावेश असे मिळून ५ कोटी १२ लाख रुपयांचा समावेश आहे. श्री गुरुपौर्णिमा उत्‍सवाच्‍या कालावधीत ३ लाख साईभक्‍तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. यामध्‍ये जनसंपर्क कार्यालय व ऑनलाईन या सेवांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button