अहमदनगरताज्या बातम्याश्रीरामपूर

‘पाया पडत नाही’, पाच लाख दे म्हणत विवाहितेचा छळ

याप्रकरणी संगीता आदिनाथ राशिनकर (वय 33 ) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पती आदिनाथ राशिनकर, शैलेजा राशिनकर (रा. बेलापूर) नयना जबाजी कसबे,

विवाहितेला मारहाण करत पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी पतीसह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संगीता आदिनाथ राशिनकर (वय 33 ) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पती आदिनाथ राशिनकर, शैलेजा राशिनकर (रा. बेलापूर) नयना जबाजी कसबे,

जबाजी कसबे (रा. आरडगाव, ता. राहुरी), भावना अशोक जाधव, अशोक जाधव (रा. भिमा कोरेगाव, जि. पुणे), ज्योत्स्ना आण्णासाहेब खिलारी,

Advertisement

आण्णासाहेब खिलारी (रा. गुजरात), निर्मला भांड, विठ्ठल भांड (रा. नगर) हिराबाई घाडगे, गणेश घाडगे (रा. बेलापूर, ता. श्रीरामपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पती आदिनाथ यांच्याशी में २०११ मध्ये विवाह झाला. वडिलांनी दीड लाख रुपये हुंडा व संसारोपयोगी वस्तू, फर्निचर दिले. मात्र, थोड्याच दिवसानंतर पतीच्या बहिणीने मानपान देत नाही व पाया पडत नाही, अशी कुरबुर सुरू केली.

त्यावरून पती दारू पिऊन शिवीगाळ करून मानसिक त्रास द्यायचा. मुलगी झाल्यानंतर सासू व नवरा यांनी वारंवार त्रास देऊन छळ केला.

Advertisement

नवीन घर घ्यायचे असल्याने माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. मावस सासू (रा. नगर) हिनेदेखील पतीकडे तक्रारी केल्या.

२०१७ मध्ये नवीन बांधलेल्या घरी राहायला आल्यानंतरही मारहाण सुरू होती. एका घटनेवेळी पतीने चाकूने मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement

Related Articles

Leave a Reply

Back to top button