अहमदनगर

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह तिघांविरूध्द गुन्हा

अहमदनगर- आई-वडिलांकडून घर संसारासाठी व नवीन घर घेण्यासाठी पैसे घेऊन ये तरच मी तुला नांदवतो, असे म्हणून विवाहितेला मारहाण केल्याप्रकरणी पतीसह तिघांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती गणेश अजिनाथ शिरसाठ, सासरे आजिनाथ शिरसाठ, सासू गंगाबाई आजिनाथ शिरसाठ (सर्व रा. टेंभुर्णी ता. शिरूर कासार, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे.

 

23 जून, 2022 रोजी फिर्यादी यांचे लग्न गणेश शिरसाठ यांच्यासोबत झाल्यानंतर त्यांनी सिन्नर (जि. नाशिक) येथे काही दिवस व्यवस्थित संसार केला. नंतर मारहाण करून दिवसातून एकदा जेवण देऊन कधीकधी उपाशी पोटी ठेवत असे. त्यानंतर ते शेवगाव येथे भाड्याने रूम घेऊन राहत होते. तेव्हा पती गणेश फिर्यादीला नेहमी मारहाण करून त्रास देत. तु तुझ्या आई-वडिलांकडून आपल्याला घर संसारासाठी व नवीन घर घेण्यासाठी पैसे घेऊन ये तरच मी तुला नांदविल, असे म्हणून शिवीगाळ करत असे.

 

त्यानंतर फिर्यादी व त्यांचे पती सासरी गेल्यानंतर सासरे आजिनाथ व सासू गंगाबाई शिरसाठ यांनी दोघांना घरात घेतले नाही. फिर्यादी यांनी भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली होती. तेथे समझोता न झाल्याने अखेर तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button